Monday, June 13, 2005

परिक्षा

Pariksha

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर; एक परिक्षा असते

नकोशी झाली कितीही; तरीही ती दयायचीच असते

या परिक्षेची रीत जराशी वेगळीच असते

pass झाल तरीही ; आणखी एक बाकीच असते

revaluation , ATKT ची सोय इथे मात्र नसते

fail झाल तर पुन्हा तीच परिक्षा कधीच नसते

जन्म म्हणजे hallticket; आयुष्यभराचं time-table असते

examiner स्वत:मध्येच लपलेला ; अन् समाधान हीच degree असते

marks किती मिळाले ? यावरुन यश ठरत नसते

परिक्षा काय शिकवून गेली ; हेच जास्त महत्वाचे असते

अभ्यास कितीही केला ; तरी परिक्षेची वेळ वेगळीच असते

कळ्तयं पण वळत नाही अशीच काहीशी गतं असते

एकाच प्रश्नासाठी ; डोक्यात अनेक उत्तरांची गर्दी असते

खरं उत्तर कोणतं ? हे कळणंच फार कठीण असते

मनातल्या अर्जुनाला विवेकाच्या श्रीकृष्णाची गरज असते

नुसती गती असून भागत नाही ; त्याला दिशाही आवश्यक असते

नशीबाच्या कागदावर जेव्हा प्रयत्नांची शाई असते

पाणी पडले, तरी मिटणार नाही ; इतकी ती भक्कम असते

समोरच्या प्रश्नांबरोबर झुंज नेहमीच दयायची असते

स्वत: उत्तरे शोधून जगायलाच तर ती शिकवतं असते

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक परिक्षा असते

~ योगी...