Udghatan
मन मोकळं करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी कोणाची बरं आठवण होईल?
"तुमच्या लाडक्या मित्राची..."
हो. मला ही सर्वप्रथम त्याचीच आठवण झाली.
मग मी त्याला म्हटलं , "मन मोकळं करायला मी सगळ्यात आधी तुझ्याकडेच येतो. त्यामुळे 'मन मोकळे...' चे उदघाटन तुझ्याच हस्ते झाले पाहिजे."
तो म्हणाला , "ठीक आहे. No problem."
>>"अरे No problem काय? तुझ्याकडे Internet connection आहे का?
हं. एक काम कर. तू इकडे ये.
माझ्या शेजारी बसून माझा हा blog वाच. म्हणजे होईल उदघाटन."
<< "हं... बरं ...."
"पण तू एक गोष्ट विसरलास.
Internet connection नसलं तरीही मी ते वाचू शकतो.
तुझ्या मनातलं वाचायची link आहे माझ्याकडे.
सगळ्यांच्या आधी वाचेन मी ते....अगदी तुझं लिहून पूर्ण होण्याच्या ही आधी."
तर अशा रितीने मी हे वाक्य लिहीपर्यंत त्याने या blog चे उदघाटन केलेही असेल। "
"अं. काय विचारलतं? कोण आहे हा माझा मित्र ?"
अरे हो तुमच्याशी ओळख करून दयायची राहिलीच.
"तर हा तो माझा लाडका मित्र"
link चालत नाहिये? बरोबर... कशी चालणार?
कारण...ती त्याच्या orkut profile ची link आहे. आणि त्याचे orkut profile अस्तित्वातच नाही.
"!dea ...photo पाठवतो."
पण तो ही एक problem आहे. कारण तो म्हणतोय की तो अदॄश्य आहे.
त्यामुळे त्याचा photo हि येणार नाही.
तरीही माझ्याकडे एक photo आहे. आणि मी माझ्या सोयीसाठी ; तो photo त्याचाच आहे असे समजतो.
तो photo तुम्हाला दाखवून ठेवतो. बघा. कुठे भेट झाली तर ओळख सांगा.
~योगी...