बाबा,
हा blog तुम्हाला तिथे वाचायला मिळेल का हे मला माहित नाही...
पण माझ्या भावना तुमच्या पर्यंत नक्की पोहोचतील.
हे पत्र फक्त तुमच्यासाठी.
---
तुम्ही तत्काळ मध्ये booking केलतं ; कुणाला विचारलं ही नाही
अन गेलात त्या दूरदेशी; जिथून return ticket मिळत नाही
इकडे किती लोक आठवण काढतील याचा विचार सुद्धा केला नाही
उचकी लागली तर प्यायला... साधी पाण्याची बाटलीही घेतली नाही
नीट packing पण झालं नव्हतं; किती पसारा टाकून गेलात?
एवढा व्याप सावरण्याचे ; हे मोठे कोडे सोडून गेलात
म्हणायचा तुम्ही "बघ मी गेल्यावर किती रांग लागेल लोकांची"
पण ते दाखवून देण्यासाठी ; गरज होती का फोटोमध्ये जाण्याची?
तुम्हाला काय सांगू नंतर इथे माझी काय गत झाली
मनात अश्रूंची नदी फुटली ; अन डोळ्यात धरणं बांधावी लागली
मीच कोलमडलो तर कोण आवरेल हा पसारा ?
खचलेल्या आईला कोण देईल सहारा ?
हात पाय गाळून आता चालणारच नव्हतं
फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायचं होतं
डोळे मिटून घेतले ; अन आठवले तुमचे रूप
तुम्ही सुद्धा आयुष्यात दु:ख पचवलीत खूप
तोच बाणा मनात ठेवून मी डोळे उघडले
वास्तवाशी झुंज देण्यास दोन हात पुढे केले
तीच झुंज आजवर अखंडपणे चालू आहे
तुम्ही दिलेल्या धड्यांचा ; आशीर्वाद सोबत आहे
फोटोमधून तुम्ही बघत असाल असा भाबडा समज आहे
तुम्हाला माझा अभिमान वाटावा ; बस्स एवढीच अपेक्षा आहे
~ योगी...
yogi,
ReplyDeletetujhe baba nakki baghat astil tula n tyanna tujha nakki abhimaan vatat asel..
gr8 post, i am sure he is proud of you..
ReplyDeleteChan lihitos mitra !!! Lihit raha...Tula shubhechcha...
ReplyDeleteखुप आठवण येते ना...
ReplyDeleteमला ही खुप आठवण आली माझ्या बाबांची हा लेख वाचुन, ५ वर्षापुर्वी बाबा आम्हाला असेच सोडुन गेले.
आई-वडील हे चंदना सारखे असतात, आयुष्याभर ते झिजतात आपले जीवन सुगंधी करण्यासाठी. त्यांनी दिलेला प्रत्येक सल्ला, शिकवण व संस्कार आपण सांभाळुन पुढील पिढीला देत जायचे.
त्यांना खुप खुप अभिमान वाटेल.
खुप छान आहे तुमचा लेख
पुढील लेखनासाठी शुभेच्छा...
Hey Yogi,
ReplyDeletePlease accept my deepest and sincere condolence. I know what it means to lose a father.My thoughts are with you and your family.
http://hamarichaupal.blogspot.com/2009/03/to-dad-with-love.html
मालक, जे काही लिहलं आहे ते अत्यंत हळवं करुन जाणारं आहे असे सांगतो.
ReplyDeleteह्या मुक्तकाला उत्तम कसे म्हणु ?
असो, छान लिहीत आहात.
पुढच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत.
- छोटा डॉन
फारच छान.. एकदम मनाला भिडणारी कविता आहे ! मी पण या अनुभवातून गेलो आहे....
ReplyDeleteअसेच लिहित रहा योगी ..
devendra .... very well expressed ....kharach khoop chaan maandli aahes .... my sincere condolences for your loss ....and all the encouragement towards the future ...i am sure you will make your father proud by tackling this situation
ReplyDeleteसुंदर लिहिलं आहेस देवेंद्र :)
ReplyDeleteकाकांना अभिमान आहे नि तो वाढतच जाईल यात काही प्रश्नच नाही...
khupach chaan!
ReplyDeletewish u could hear ur dad's comments on this... but i am sure ek khasNbhar doLe miTales tar tula tyachya pratikriya jaNavatil...
मनाला स्पर्शून हळवं करुन गेलं हे मुक्तक ! तुमच्या बाबांना तुमचा खूप अभिमान वाटत असेल ! काळजी घ्या !
ReplyDelete