बाबा,
हा blog तुम्हाला तिथे वाचायला मिळेल का हे मला माहित नाही...
पण माझ्या भावना तुमच्या पर्यंत नक्की पोहोचतील.
हे पत्र फक्त तुमच्यासाठी.
---
तुम्ही तत्काळ मध्ये booking केलतं ; कुणाला विचारलं ही नाही
अन गेलात त्या दूरदेशी; जिथून return ticket मिळत नाही
इकडे किती लोक आठवण काढतील याचा विचार सुद्धा केला नाही
उचकी लागली तर प्यायला... साधी पाण्याची बाटलीही घेतली नाही
नीट packing पण झालं नव्हतं; किती पसारा टाकून गेलात?
एवढा व्याप सावरण्याचे ; हे मोठे कोडे सोडून गेलात
म्हणायचा तुम्ही "बघ मी गेल्यावर किती रांग लागेल लोकांची"
पण ते दाखवून देण्यासाठी ; गरज होती का फोटोमध्ये जाण्याची?
तुम्हाला काय सांगू नंतर इथे माझी काय गत झाली
मनात अश्रूंची नदी फुटली ; अन डोळ्यात धरणं बांधावी लागली
मीच कोलमडलो तर कोण आवरेल हा पसारा ?
खचलेल्या आईला कोण देईल सहारा ?
हात पाय गाळून आता चालणारच नव्हतं
फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायचं होतं
डोळे मिटून घेतले ; अन आठवले तुमचे रूप
तुम्ही सुद्धा आयुष्यात दु:ख पचवलीत खूप
तोच बाणा मनात ठेवून मी डोळे उघडले
वास्तवाशी झुंज देण्यास दोन हात पुढे केले
तीच झुंज आजवर अखंडपणे चालू आहे
तुम्ही दिलेल्या धड्यांचा ; आशीर्वाद सोबत आहे
फोटोमधून तुम्ही बघत असाल असा भाबडा समज आहे
तुम्हाला माझा अभिमान वाटावा ; बस्स एवढीच अपेक्षा आहे
~ योगी...
मनमोकळे...
जे माझ्या मनात आलं ते तुमच्यासमोर ठेवण्यासाठी...
जे कागदावर आलं ते 'मनमोकळे'पणे सांगण्यासाठी
मन मोकळे...
'मन'पक्ष्याला या आकाशात 'मोकळे' सोडण्यासाठी...
अन त्याचा मुक्त विहार या लेखणीने टिपण्यासाठी
Wednesday, June 30, 2010
Thursday, June 18, 2009
नि:शब्द
IIT मधले शेवटचे काही दिवस...
निरोप घेताना मनात आलेल्या भावना टिपण्याचा एक प्रयत्न
आज या संध्याकाळी मी उभा इथे वळणावर
टाकतोय एक नजर या सरल्या वाटेवर
जुन्या आठवणींचा चित्रपट उभा एका डोळ्यासमोर
अन दुसरा डोळा डोकावतोय नव्या वाटांच्या क्षितिजावर
दोन डोळ्यांमध्ये मी हेलकावे घेतोय
एखाद्या लोलका सारखा
अन मागतोय शब्दांची साथ
जरा सावरण्यासाठी
पण...
आज शब्दही वाट हरवून बसलेत
मी झालोय पूर्णतः नि:शब्द
~ योगी...
निरोप घेताना मनात आलेल्या भावना टिपण्याचा एक प्रयत्न
आज या संध्याकाळी मी उभा इथे वळणावर
टाकतोय एक नजर या सरल्या वाटेवर
जुन्या आठवणींचा चित्रपट उभा एका डोळ्यासमोर
अन दुसरा डोळा डोकावतोय नव्या वाटांच्या क्षितिजावर
दोन डोळ्यांमध्ये मी हेलकावे घेतोय
एखाद्या लोलका सारखा
अन मागतोय शब्दांची साथ
जरा सावरण्यासाठी
पण...
आज शब्दही वाट हरवून बसलेत
मी झालोय पूर्णतः नि:शब्द
~ योगी...
Subscribe to:
Posts (Atom)